sneh_kavi

Get ranking button

Sneha Mirgane (मिस्नेहा) @sneh_kavi
Ranking:
# 477
Country:
    India

Wrong country?

Change country

थांब जरा आयुष्या,
थोडंस काहीतरी राहिलंय!
थोडे मोकळे श्वास
थोडे हळवे आभास
थोडं मुक्त आभाळ
थोडी प्रेमळ सकाळ
थोडी उबदार कुशी
थोडी मऊ उशी
थोड्या दिशाहीन वाटा
थोड्या बेभान लाटा
थोडी मायेची शाल
थोडी खंबीर ढाल
थोडा कठोर त्रागा
थोडी डोळ्यातली चंद्रभागा
थोडं बागडणारं अंगण
थोडा भरलेला रांजण
थोडा मायेचा आरसा
थोडा संपलेला वारसा
थोडा लेकीचा जन्म
थोडं ऋण आजन्म
-©मिस्नेहा
(18/5/19 1:31AM)

2019-05-18 11:20

1110 47

 

थांब जरा आयुष्या, थोडंस काहीतरी राहिलंय! थोडे मोकळे श्वास थोडे हळवे आभास थोडं मुक्त आभाळ थोडी प्रेमळ सकाळ थोडी उबदार कुशी थोडी मऊ उशी थोड्या दिशाहीन वाटा थोड्या बेभान लाटा थोडी मायेची शाल थोडी खंबीर ढाल थोडा कठोर त्रागा थोडी डोळ्यातली चंद्रभागा थोडं बागडणारं अंगण थोडा भरलेला रांजण थोडा मायेचा आरसा थोडा संपलेला वारसा थोडा लेकीचा जन्म थोडं ऋण आजन्म -©मिस्नेहा (18/5/19 1:31AM)

सकाळ सकाळ ती मंदिरात कशी हा मला पडलेला प्रश्न होता. विचारपूस करण्यासाठी तिच्या जवळ गेले आणि पाहते तर काय तिच्या ओंजळीत चाफ्याची फुले! पण चेहऱ्यावर मोठी गोंधळलेली दिसली. .
मी सहज विचारलं,"अग देवालाच आणलीयेत ना फुलं? मग वहा की.." .
ती उत्तरली," फुले या दगडाच्या देवाला वाहावीत की स्वतःजवळ स्वतःच्या दगडमनासाठी ठेवावीत हाच मोठा प्रश्न माझ्यासाठी!"
माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून ती जरा हसली..
. "चाफा पहिला की मला त्याची आठवण येते" .
किती सहजतेनं त्या फुलांना ओंजळीत घेऊन ती म्हणाली!! पण पुढच्याच क्षणी ती ओंजळ तिने देवाच्या चरणी अर्पण केली.
मी तिच्याकडे आश्चर्यानं एकटक पहातच होते अन तिने फक्त माझ्याकडे एक कटाक्ष टाकला त्यावेळी तिच्या डोळ्यातले अश्रू अन ओठांवरचं हसू मला कोड्यात पाडून गेलं.
-©मिस्नेहा
Pc: @swa.ra.li

2019-05-14 05:23

644 11

 

सकाळ सकाळ ती मंदिरात कशी हा मला पडलेला प्रश्न होता. विचारपूस करण्यासाठी तिच्या जवळ गेले आणि पाहते तर काय तिच्या ओंजळीत चाफ्याची फुले! पण चेहऱ्यावर मोठी गोंधळलेली दिसली. . मी सहज विचारलं,"अग देवालाच आणलीयेत ना फुलं मग वहा की.." . ती उत्तरली," फुले या दगडाच्या देवाला वाहावीत की स्वतःजवळ स्वतःच्या दगडमनासाठी ठेवावीत हाच मोठा प्रश्न माझ्यासाठी!" माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून ती जरा हसली.. . "चाफा पहिला की मला त्याची आठवण येते" . किती सहजतेनं त्या फुलांना ओंजळीत घेऊन ती म्हणाली!! पण पुढच्याच क्षणी ती ओंजळ तिने देवाच्या चरणी अर्पण केली. मी तिच्याकडे आश्चर्यानं एकटक पहातच होते अन तिने फक्त माझ्याकडे एक कटाक्ष टाकला त्यावेळी तिच्या डोळ्यातले अश्रू अन ओठांवरचं हसू मला कोड्यात पाडून गेलं. -©मिस्नेहा Pc: @swa.ra.li

अनर्थाचीच ती बात मला मान्य नाही. .
भयाण-काळी ती रात मला मान्य नाही. .
.
सुखाचा रस्ता दाखवून धोका देणारी 
भुलवणारी ती वाट मला मान्य नाही. .
.
मुखवट्याआड लपलेल्या खोट्या नात्यांची 
खोटी रेशमी ती गाठ मला मान्य नाही. .
.
विषप्रयोग होतात हो मिष्ठांनाच्या आत 
आपलेच ते गोड ताट मला मान्य नाही. .
.
दुबळे बनविते जी रात हळव्या मनाला 
एक रात्रीची ती साथ मला मान्य नाही. .
.
स्वार्थासाठी आशेन पेटवते सार रान 
भडकणारी तीच वात मला मान्य नाही. .
.
गहाण ठेऊन दिली नाहक बुद्धी ज्यांनी 
बेईमान ती जात मला मान्य नाही.
-©मिस्नेहा
.
.
(मी पहिल्यांदाच गझल लिहिण्याचा प्रयत्न केला, थोडं जमलं, थोडं नाही किंवा कदाचित जमलंही नसावं. पण तरीही हा छोटासा प्रयत्न स्वतःलाच आनंद देण्यासाठी केलेला!!! आणि मनापासून धन्यवाद प्रतीक( @shabdalay ), मोलाची मदत केल्याबद्दल😊)

2019-05-11 13:49

1002 83

 

अनर्थाचीच ती बात मला मान्य नाही. . भयाण-काळी ती रात मला मान्य नाही. . . सुखाचा रस्ता दाखवून धोका देणारी भुलवणारी ती वाट मला मान्य नाही. . . मुखवट्याआड लपलेल्या खोट्या नात्यांची खोटी रेशमी ती गाठ मला मान्य नाही. . . विषप्रयोग होतात हो मिष्ठांनाच्या आत आपलेच ते गोड ताट मला मान्य नाही. . . दुबळे बनविते जी रात हळव्या मनाला एक रात्रीची ती साथ मला मान्य नाही. . . स्वार्थासाठी आशेन पेटवते सार रान भडकणारी तीच वात मला मान्य नाही. . . गहाण ठेऊन दिली नाहक बुद्धी ज्यांनी बेईमान ती जात मला मान्य नाही. -©मिस्नेहा . . (मी पहिल्यांदाच गझल लिहिण्याचा प्रयत्न केला, थोडं जमलं, थोडं नाही किंवा कदाचित जमलंही नसावं. पण तरीही हा छोटासा प्रयत्न स्वतःलाच आनंद देण्यासाठी केलेला!!! आणि मनापासून धन्यवाद प्रतीक( @shabdalay ), मोलाची मदत केल्याबद्दल😊)

जोडण्यापेक्षा तोडणं खूप सोप्प झालंय.

2019-05-11 02:11

704 19

 

जोडण्यापेक्षा तोडणं खूप सोप्प झालंय.

दुःखाच्या वेळी साथ न देता वेळ गेल्यावर विचारणारी जवळची व्यक्ती मला त्या व्यक्तीसारखी वाटते, जी आपल्याला मरताना फक्त पहात राहते आणि मातीला न चुकता येते...
मग तेव्हा हाती अंत्यसंस्काराशिवाय काहीच उरत नाही...
फरक फक्त एकच, एका बाजूला नातं जळत असतं तर दुसऱ्या बाजूला देह!
-©मिस्नेहा

2019-04-30 18:48

887 30

 

दुःखाच्या वेळी साथ न देता वेळ गेल्यावर विचारणारी जवळची व्यक्ती मला त्या व्यक्तीसारखी वाटते, जी आपल्याला मरताना फक्त पहात राहते आणि मातीला न चुकता येते... मग तेव्हा हाती अंत्यसंस्काराशिवाय काहीच उरत नाही... फरक फक्त एकच, एका बाजूला नातं जळत असतं तर दुसऱ्या बाजूला देह! -©मिस्नेहा

आणि खरी चूक इथं करतो आपण, अतिचांगलं वागून..त्यामुळे कुणाशी एव्हढही चांगलं वागू नका की लोकं आपल्याला विकून येतील बाजारात.

2019-04-30 15:13

823 34

 

आणि खरी चूक इथं करतो आपण, अतिचांगलं वागून..त्यामुळे कुणाशी एव्हढही चांगलं वागू नका की लोकं आपल्याला विकून येतील बाजारात.

तुझ्या कवेत गवसायचे
अत्तराचे सुगंध
सांगशील एकदा
कस्तुरीमृग
तू कोण्या वनातला? .

तुझ्या स्पर्शात सापडायची
कोमल स्पंदने
सांगशील एकदा
चाफा
तू कोण्या रानातला?
-©मिस्नेहा
Pc: @sneh_kavi

2019-04-27 10:49

523 9

 

तुझ्या कवेत गवसायचे अत्तराचे सुगंध सांगशील एकदा कस्तुरीमृग तू कोण्या वनातला . तुझ्या स्पर्शात सापडायची कोमल स्पंदने सांगशील एकदा चाफा तू कोण्या रानातला -©मिस्नेहा Pc: @sneh_kavi

होके भी ना होना।💔

2019-04-24 20:35

452 10

 

होके भी ना होना।💔

मला तिच्यावर लिहायचंय एक दिवस...
 #dedicated♥

2019-04-23 19:56

583 18

 

मला तिच्यावर लिहायचंय एक दिवस... #dedicated

"मी निर्भया" .
अंगावरचे अन आत्म्याचे ओरखडे घेवून 
मी जगत होते
मी लढत होते 
प्रतिकार करत होते 
शेवटच्या श्वासा पर्यंत
हो तीच ती
मी निर्भया
वासनांधतेची शिकार
अमानवतेचा 
का नाही झाला धिक्कार
त्या भयान दिवशी 
काली माताही रडली होती
मागावया न्याय ती 
जगाशी निर्भयपणे नडली होती
देईल का हो कुणी मला 'न्याय'
संपवेल का कुणी माझ्यावरचा 'अन्याय'
खरंच
नव्हता तो फक्त बलात्कार
तो होता अमानवी क्रुरतेचा साक्षात्कार
फक्त मीच का लढायचं जगाशी?
स्वतःच संपणारं अस्तित्व टिकवण्यासाठी
न्यायाची भीक मागण्यासाठी
हो तीच ती ,
न्यायाची भिकारडी
मी निर्भया!!!
"न्यायाच्या प्रतीक्षेत....."
-©मिस्नेहा
Pc:- @aakash.a.dhumal

2019-04-22 06:25

833 35

 

"मी निर्भया" . अंगावरचे अन आत्म्याचे ओरखडे घेवून मी जगत होते मी लढत होते प्रतिकार करत होते शेवटच्या श्वासा पर्यंत हो तीच ती मी निर्भया वासनांधतेची शिकार अमानवतेचा का नाही झाला धिक्कार त्या भयान दिवशी काली माताही रडली होती मागावया न्याय ती जगाशी निर्भयपणे नडली होती देईल का हो कुणी मला 'न्याय' संपवेल का कुणी माझ्यावरचा 'अन्याय' खरंच नव्हता तो फक्त बलात्कार तो होता अमानवी क्रुरतेचा साक्षात्कार फक्त मीच का लढायचं जगाशी स्वतःच संपणारं अस्तित्व टिकवण्यासाठी न्यायाची भीक मागण्यासाठी हो तीच ती , न्यायाची भिकारडी मी निर्भया!!! "न्यायाच्या प्रतीक्षेत....." -©मिस्नेहा Pc:- @aakash.a.dhumal

❤

2019-04-21 11:26

675 12

 

काल ज्यांनी नितीमूल्यांची राख केली, आज तीच राख अंगाला फासून भोंदूबाबाचं नाटक केलंय.
प्रत्येकजण असाच भोंदू बनलाय. कोणी लोकांना फसवतं तर कोणी स्वतःच्याच मनाला! गर्दीतही मुखवटे घालून फिरणारे कित्येक पाहिलेत. कुणी तो मुखवटा दुसऱ्यांना फसवण्यासाठी घातलेला असतो तर कुणी स्वतःच्या मनास...
नितीमूल्यांची जशी राख झाली, तशीच भावनांची होळी जळताना पाहिलीय मी, अशा कित्येक होळया भोंदू मुखवट्याआड आजही जळत आहेत.
"अविरतपणे.."
नेमकं काय अन किती फसवावं. का उगाच खोटे मुखवटे घालून वावरावं!!
मुखवट्याआडचं जगणं अजून किती दिवस जगावं!!
खरंच, अजूनही कळत नाही मला...
-©मिस्नेहा

2019-04-21 06:56

989 24

 

काल ज्यांनी नितीमूल्यांची राख केली, आज तीच राख अंगाला फासून भोंदूबाबाचं नाटक केलंय. प्रत्येकजण असाच भोंदू बनलाय. कोणी लोकांना फसवतं तर कोणी स्वतःच्याच मनाला! गर्दीतही मुखवटे घालून फिरणारे कित्येक पाहिलेत. कुणी तो मुखवटा दुसऱ्यांना फसवण्यासाठी घातलेला असतो तर कुणी स्वतःच्या मनास... नितीमूल्यांची जशी राख झाली, तशीच भावनांची होळी जळताना पाहिलीय मी, अशा कित्येक होळया भोंदू मुखवट्याआड आजही जळत आहेत. "अविरतपणे.." नेमकं काय अन किती फसवावं. का उगाच खोटे मुखवटे घालून वावरावं!! मुखवट्याआडचं जगणं अजून किती दिवस जगावं!! खरंच, अजूनही कळत नाही मला... -©मिस्नेहा

NEXT PAGE

INDIA

Top Instagram followed

#100@katrinakaif
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/cb41fc59efb38d022cf57d9f4642a300/5D5C4B11/t51.2885-19/s150x150/46706193_203447957272134_5913142159443230720_n.jpg?_nc_ht=scontent-bru2-1.cdninstagram.com katrinakaiffollowed by: 22066746
#101@aajtak
https://scontent-lht6-1.cdninstagram.com/vp/9b40e9f292644f7e24f6f5adde68f0e9/5D68A30D/t51.2885-19/s150x150/19228497_1919818801365215_1043428829588094976_a.jpg?_nc_ht=scontent-lht6-1.cdninstagram.com aajtakfollowed by: 1890674
#102@myogi_adityanath
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/bcd5c309c08d14d6d3b4eb3fc22344c4/5D6880E1/t51.2885-19/s150x150/16585416_386251445079928_6814971414840344576_a.jpg?_nc_ht=scontent-bru2-1.cdninstagram.com myogi_adityanathfollowed by: 1195178
#103@akshayaddr
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/b2a3a5aecede42887819e94a7b8e93fa/5D635C34/t51.2885-19/s150x150/39751912_1101193550042183_3654229291505287168_n.jpg?_nc_ht=scontent-bru2-1.cdninstagram.com akshayaddrfollowed by: 901499
#104@zeemarathiofficial
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/d6f3b75b9ff569ae20f0718dfb0d33c4/5D5BB98B/t51.2885-19/s150x150/22427494_124927994880045_4144847150938849280_n.jpg?_nc_ht=scontent-bru2-1.cdninstagram.com zeemarathiofficialfollowed by: 864430
#105@swwapnil_joshi
https://scontent-bru2-1.cdninstagram.com/vp/f0c7eb97ad9c1395037f825b16b0d56f/5D7C6D01/t51.2885-19/s150x150/59022962_2323653047693655_1368492338464161792_n.jpg?_nc_ht=scontent-bru2-1.cdninstagram.com swwapnil_joshifollowed by: 772624

See more instagram profiles from

INDIA

MORE